All deleted tweets from politicians

Anil Shidore अनिल शिदोरे

Follow

नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना http://mnsblueprint.org, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI http://maitripune.net

This may be an incomplete list. If you think we're missing someone, please send us their Name, Country/State, Political Party, Office they hold or are seeking and, of course, Twitter handle. Thanks!

“पी एम केअर्स” हा पंतप्रधानांचं नाव असलेला निधी अधिकृत सरकारी निधी नाही हे वाचून धक्काच बसला. मग विविध सरकारी खात्याकडून तिथे निधी देण्याची विनंती का होत होती? खाजगी निधी असल्यामुळे त्याचे व्यवहार माहिती अधिकाराखाली येणार की नाही? त्याचा खर्च जनतेला उत्तरदायी असणार की नाही? https://t.co/wrFOkP9rhU

आपण स्मार्टफोनवर "scrolling" करतो, त्याला मराठी प्रतिशब्द काय? Scroll म्हणजे गुंडाळी... एखादा कागद आपण गुंडाळून ठेवतो आणि नंतर आपण तो गुंडाळी सोडवत वाचतो तसं स्मार्टफोनवर आपण खाली खाली करत वाचत जातो त्याला स्क्रोलिंग म्हणतात. म्हणून स्क्रोलिंग म्हणजे "गुंडाळवाचन" म्हणता येईल का?

#साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय संतापजनक आहे. त्याचा निषेध.. अशाच दोन घटना पुण्यातही नुकत्या घडल्या. समाजातला धाक संपलेला दिसतो आहे. पोलीस यंत्रणा तर जागरूक हवीच परंतु पोलीस ठाण्यासोबत महिला संघटना, स्थानिक महिला मंडळं ह्यांचाही सहभाग घ्यायला हवा. समाजाचंही नियंत्रण हवं.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरनंतर हरियानातील कर्नाल .. शेतकरी आणि सरकार संघर्षाच्या पुढच्या टप्प्यावर आले आहेत.. दोन्ही बाजूंनी चर्चेसाठी पुढे आलं पाहिजे. नाहीतर प्रकरण चिघळू शकतं. #KisanMahaPanchayat #Karnal

“आमच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे, मात्र आम्हाला सरकारशी संघर्षात रूची नाही..” असं सर्वोच्च न्यायालयानी केंद्र सरकारला म्हणणं ही खूप गंभीर गोष्ट आहे .. नोंद घेण्याजोगी. #नोंद https://t.co/YmTQ3XNvA2

गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा २५ रूपयांनी वाढली. पुन्हा पुन्हा.. परंतु आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही. कारण “का” हा प्रश्न विचारायचं आपण विसरलो आहे..

गोवा विधानसभेनं "गोवा भूमीपुत्र अधिकारिणी बील, २०२१" ह्या नावानं एक कायदा चर्चेत आणला आहें. त्यात भूमीपुत्र कोण ह्यावरून संघर्ष असला तरी एखाद्या राज्यानी त्यांच्या भूमीपुत्रांच्या हक्कांसाठी काही कायदा करणं ही गोष्ट महत्वाची. महाराष्ट्रानंही असा काही विचार केला पाहिजे..

देशातील ५०% पेक्षा अधिक प्रौढ व्यक्तींना कोविडच्या लसीकरणाचा किमान एक डोस देऊन झाला आहे ही चांगली गोष्ट आहे. सरकारला आता सर्व गोष्टी हळूहळू सुरू करायला हरकत नाही, मुख्यत: जिथे कोविडची प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे अशा भागातील शाळा ! @Maitripune

आरक्षणाचा भुलभुलैय्या आपल्या मुलभूत समस्यांपासून आपल्याला कसा दूर नेतो आहे.. श्रीरंजन आवटे @Shriranjancs ह्यांचा आजच्या लोकसत्तेतील उत्तम लेख .. समस्येचा घेतलेला अचूक वेध. @LoksattaLive आणि इतर वृत्तपत्रांना विनंती की एक तरी लेख विस्तृत छापा. वाचणारी काही माणसं शिल्लक आहेत अजून. https://t.co/jlUxh1TZVy